Byjus : बायजूने केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या चर्चेनंतर १४० कामगारांना काढण्याचा निर्णय घेतला मागे | पुढारी

Byjus : बायजूने केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या चर्चेनंतर १४० कामगारांना काढण्याचा निर्णय घेतला मागे

तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर बायजू (Byjus) या कंपनीने केरळमधील आपली सेवा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे १४० कर्मचाऱ्यांची जाणारी नोकरी तुर्तास वाचली आहे. नोकरी जाण्याच्या भितीने या कर्मचाऱ्यांनी कामगार मंत्री वी. सिवकुट्टी यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. यांनतर घडलेल्या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बायजू या कंपनीने आपला निर्णय मागे घेतला. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार बायजूने कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय आपले टेक्नोपार्क कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

बायजूकडून (Byjus) मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार कंपनीने सांगितले की, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. यानंतर कंपनीने टीवीएम (तिरुवनंतपुरम) प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटर पुर्ववत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यामुळे या सेंटरमध्ये काम करणारे १४० कर्मचारी आपले काम चालू ठेवू शकतात, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन हे मूळचे केरळचे आहेत. त्यामुळे ते आपल्या राज्याप्रतीचे उत्तरदायित्त्व ओळखतात व हे सेंटर चालू ठेऊन ते राज्यातील विस्ताराचे कार्य पुढे चालू ठेवतील.

बायजू (Byjus) कंपनी देशाभरातून आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करीत आहे. साधारण ५० हजार कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात कंपनीकडून केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर तिरुवनंतपूरम मधील सेंटर बंद करुन बायजू कंपनी येथील १४० कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार होती. परंतु, केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे कंपनी येथील सेंटर चालू ठेवणार असून आता या १४० कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार नाही.

दरम्यान बायजू कंपनीचे संस्थापक व सीईओ बायजू रवींद्रन यांनी कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या कपातीबाबत दिलगीरी व्यक्त करत, कंपनीतून  कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी माफी मागितली आहे. या बाबतचे त्यांचे ईमेल जोरदार व्हायरल होत आहे.

सीईओ बायजू रवींद्रन यांनी केलेला ईमेल

प्रिय कंपनी सदस्य,
गेल्या काही आठवड्यांमध्ये, तुम्ही आपल्या कंपनीतील बदलांच्या योजना पाहत असाल किंवा ऐकत असाल. तुमच्यापैकी काहीजण याच्या विरोधात असतील किंवा कदाचित याबद्दल गोंधळलेले देखील असतील. म्हणून, मी तुम्हाला लिहित आहे जेणेकरून आम्ही काय करत आहोत, आम्ही ते का करत आहोत आणि मला त्याबद्दल कसे वाटते हे तुम्ही थेट माझ्याकडून ऐकायला मिळेल.


अधिक वाचा :

Back to top button