देशातील ‘मालगाड्या’ सुसाट! रेल्वेची ९२ हजार ३४५ कोटींची कमाई

देशातील ‘मालगाड्या’ सुसाट! रेल्वेची ९२ हजार ३४५ कोटींची कमाई
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून कोट्यवधींचा महसूल कमावला आहे. रेल्वेने गेल्या सात महिन्यात तब्बल ९२ हजार ३४५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दरम्यानच्या काळात झालेल्या एकूण ७८ हजार ९२१ कोटींच्या तुलनेत यंदा महसुलात १७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

प्राप्त माहितीनूसार, एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या काळात रेल्वेने एकूण ८५५.६३ मेट्रिक टन मालवाहतूक केली. गतवर्षी एप्रिल-ऑक्टोबर २०२१ दरम्यान ७८६.२ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली होती. यंदा मालवाहतुकीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गतमहिन्यात ११८.९४ मेट्रिक टन मालवाहतूक करीत १३ हजार ३५३ कोटी महसूल रेल्वेने कमावला. तर ऑक्टोबर २०२१ मध्ये हे प्रमाण ११७.३४ मेट्रिक टन एवढे होते. गतवर्षी याकाळात रेल्वेच्या तिजोरीत १२ हजार ३१३ कोटी महसुलाची भर पडली होती. यंदा मात्र या महसुलात ८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

"हंग्री फॉर कार्गो" हा मंत्र रेल्वेने अनुसरला आहे. या अनुषंगाने व्यवसाय सुलभतेसाठी आणि स्पर्धात्मक किमतीत अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहेत. यामुळे रेल्वे मालवाहतुकीवर विश्वास वाढला आहे, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news