

बंगळूर; वृत्तसंस्था : गुजरातेतील मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 130 वर लोकांचा मृत्यू झालेली घटना ताजी असताना, कर्नाटकमधील येल्लापुरा शहरातील अशाच एका झुलत्या पुलावर थेट चार चाकी नेत हुल्लडबाजी करणार्या पर्यटकांचा चित्रित झालेला व्हिडीओ समोर आला आहे.
या पुलावर पर्यटकांनी एकच हुल्लडबाजी केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पुलावरून थेट कार नेल्याचेही दिसत आहे. हुल्लडबाज पर्यटकांची चार चाकी ही महाराष्ट्रातील कोल्हापुरातील आहे. यामुळे हे पर्यटकही कोल्हापुरातीलच असावेत अशी ही शक्यता आहे. या घटनेबाबत कळताच स्थानिकांनी पर्यटकांना रोखले.