भारत जोडो यात्रेदरम्यान धक्का लागून नितीन राऊत जखमी, रुग्णालयात दाखल | पुढारी

भारत जोडो यात्रेदरम्यान धक्का लागून नितीन राऊत जखमी, रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते, माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान हैदराबादमध्ये झालेल्या गर्दीत खाली पडले. त्यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या ५६ दिवसांपासून सुरू आहे. सध्या ही यात्रा तेलंगणामध्ये असुन लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक मोठे नेतेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील काही नेते या यात्रेत सहभागी झाले होते. काल नितीन राऊत यांना यात्रेदरम्यानच्या धावपळीत खाली पडले. यामध्ये ते जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील बेशुद्ध झाले. त्यांच्या डोक्याला छोटीशी जखम झाली आहे. आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा पोहोचल्यानंतर त्यामध्ये ते सहभागी होतील, असे तिने म्हटले आहे.

Back to top button