दिल्‍लीतील नरेलात प्लास्‍टिकच्या कारखान्याला भीषण आग; दोघांचा मृत्‍यू, अनेकजण अडकले | पुढारी

दिल्‍लीतील नरेलात प्लास्‍टिकच्या कारखान्याला भीषण आग; दोघांचा मृत्‍यू, अनेकजण अडकले

नवी दिल्‍ली : दिल्‍लीच्या नरेला भागात आज (मंगळवार) सकाळी एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत २ लोकांचा मृत्‍यू झाला असून, आगीच्या भडक्‍यात अनेक लोक भाजून गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्‍थळी अग्‍नीशमनचे ११ बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्‍नस सुरू आहेत. या आगीपासून वाचण्यासाठी लोक कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी धावू लागले, मात्र आग इतकी भयंकर होती की, लोक कारखान्यातच अडकून पडले.

दिल्‍ली पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत २ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. एक व्यक्‍ती भाजून गंभीर जखमी झाला आहे. तर २ लोकांना वाचवण्यात आले असून ते गंभीर असल्‍याने त्‍यांना उपचारांसाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे. अद्याप ८ ते १० लोक कारखान्यातच अडकल्‍याची भीती व्यक्‍त करण्यात येत असून, आगीत मृत्‍यूमुखी पडलेल्‍या व्यक्‍तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हारल झाले आहेत. यामध्ये दोन मजली इमारतीला आग लागली असून, इमारतीतून काळ्याकुट्ट धुराचे लोट बाहेर पडत असल्‍याचे दिसून येत आहे. घटनास्‍थळी नागरिकांनी गर्दी केली असून, बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी हा परिसर मोकळा करायला सुरूवात केली आहे.

नरेला परिसरातील आगीची हि पहिला घटना नाही. या आधीही मे महिन्यात नरेलातील एका प्लास्‍टिकच्या कारखान्याला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, अनेक तासांच्या प्रयत्‍नानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य झाले होते.

हेही वाचा :  

Back to top button