Food For Winter: थंडी सुरू झाली…. ही फळे आणि फळभाज्या खा! | पुढारी

Food For Winter: थंडी सुरू झाली.... ही फळे आणि फळभाज्या खा!

पुढारी ऑनलाईन: थंडी सुरू झाली आहे. यादरम्यान प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. थंडीत बहुतांश लोकांना सर्दी-खोकला, ताप, घसा गवगवणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. थंडीत प्रकृती चांगली राखण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरोग्यदायी आहार (Food For Winter) घ्यावा लागतो. काही प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या थंडीच्या दिवसात तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. सी-जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ खाल्यास ते या काळात अधिक लाभदायक ठरतात.

संत्री

संत्री सी-जीवनसत्त्वाचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. 100 ग्रॅम संत्र्यामध्ये सुमारे 53.2 मिलीग्रम सी-जीवनसत्त्व असते. यामुळे शरीरातील पेशी मजबूत करण्यास मदत होते आणि त्वचाही चांगली राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संत्र्यातील सी-जीवनसत्त्वामुळे शरीराची प्रतिकारशक्ती (Food For Winter)  वाढवते.

ब्रोकली

100 ग्रॅम फ्लॉवरमध्ये 89.2 मिलिग्रॅम सी-जीवनसत्त्व असल्याचे सांगितले जाते. अर्धा कप उकळलेल्या फ्लॉवरमधून रोज गरज असलेल्या 57 टक्के सी- जीवनसत्त्वाची पूर्तता केली जाते. त्याशिवाय प्रोटिन्स, पोटॅशियम यासारखे महत्त्वपूर्ण पोषकतत्त्वे फ्लॉवरमधून शरीराला मिळतात.

शिमला मिरची

शिमला मिरचीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये सी-जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. एका शिमला मिरचीतून रोजच्या गरजेपेक्षा आपल्याला 169 टक्के सी-जीवनसत्त्व मिळते. शिमला मिरचीमध्ये पोषक तत्त्वांचा एक खजानाच असल्याचे मानले जाते.

केळी

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या - arogyanama.com

अन्य फळभाज्यांचा विचार करता केळीमध्ये सर्वाधिक सी-जीवनसत्त्व असते. सी-जीवनसत्त्व मिळणारा केळी सर्वात चांगला स्रोत मानला जातो. 100 ग्रॅम केळीमध्ये 120 मिलीग्रॅम सी-जीवनसत्त्वे असतात. सी-जीवनसत्त्वाशिवाय केळीमध्ये ए-जीवनसत्त्व आणि के-जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी अत्यंत स्वादिष्ट फळ आहे. यामध्ये सी-जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. एक कप स्टॉबेरीमध्ये सुमारे 90 मिलिग्रॅम सी-जीवनसत्त्व असते. स्टॉबेरी मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे एक उत्कृष्ट स्रोत मानले जाते.

टोमॅटो

आपल्या आहारात नेहमीच टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. टोमॅटो सी-जीवनसत्त्वाने खूपच समृद्ध आहे. मध्यम आकाराचा टोमॅटो रोज खाल्यास त्यातून शरीराला 28 टक्के सी-जीवनसत्त्व मिळते. टोमॅटोमध्ये बी आणि ई-जीवनसत्त्वासह अन्य पोषक तत्त्वे असतात. टोमॅटो अशी फळबाजी आहे जी आपण कच्चीही खाऊ शकतो.

हेही वाचा:

Back to top button