Earthquake in MP : मध्य प्रदेश, छत्तीसगड भूकंपाने हादरले | पुढारी

Earthquake in MP : मध्य प्रदेश, छत्तीसगड भूकंपाने हादरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मंगळवारी सकाळी ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जबलपूरपासून 35 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के सौम्य होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्येही काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

जबलपूर हे भूकंप संवेदनशील क्षेत्रांतर्गत येते. येथे वारंवार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसतात. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जबलपूर पासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडला रोडवर असल्याची माहिती मिळत आहे. दिंडोरी, मंडला, जबलपूर, बालाघाट, अनुपपूर, उमरिया येथे भूकंपाचे धक्के जाणवताच एसडीआरएफला सतर्क करण्यात आले. उंच इमारतींमध्ये बसलेल्या लोकांना हा भूकंप अधिक जाणवला असल्याचे सांगण्यात आले.

याआधी २२ मे १९९७ ला विनाशकारी भूकंपाचे धक्के बसले होते. त्याची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल होती. तेव्हा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचा केंद्रबिंदूही मंडला रोडवरील कोसमघाट जवळ होता. त्यानंतर 21 जून 2022 ला देखील 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसले होते.

हेही वाचा :

Back to top button