Maharashtra political crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर २९ नोव्हेंबरला सुनावणी | पुढारी

Maharashtra political crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर २९ नोव्हेंबरला सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra political crisis) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी आता २९ नोव्हेंबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील वकिलांना या प्रकरणाचे संकलन पूर्ण करण्यास आणि चार आठवड्यांच्या आत ठळक मुद्दे तयार करण्यास सांगितले.

गेल्या सुनावणीत घटनापीठाने खरी शिवसेना कोणाची? याचा निवाडा निवडणूक आयोग करेल, असे स्पष्ट करीत बंडखोर शिंदे गटाला दिलासा दिला होता. परंतु, आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयाने कुठलेही निर्देश दिले नव्हते.

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यापासून आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. न्यायालयाने निवडणूक आयोगाला यासंबंधी कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले होते. याही निर्णयावर स्थापन केलेल्या घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घातलेली बंदी उठवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra political crisis)

हे ही वाचा :

Back to top button