China : जिनपिंगच सर्वेसर्वा! माजी राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी, पंतप्रधानांसह चौघांची उचलबांगडी! | पुढारी

China : जिनपिंगच सर्वेसर्वा! माजी राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी, पंतप्रधानांसह चौघांची उचलबांगडी!

पुढारी ऑनलाइन डेस्क : माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ, विद्यमान पंतप्रधान तसेच राष्ट्राध्यक्ष पदाचे इच्छुक ली केक्यांग तसेच तीन अन्य उच्चपदस्थ अधिकार्‍यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अत्यंत अपमानजनक पद्धतीने बाजूला केले आहे. जिनपिंग यांनी ली केक्यांग यांच्यासह चौघा उच्चपदस्थ अधिकार्‍यांना पदावरून पायउतार केले; पण माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचा तर घोर अपमान केला. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस अत्यंत कडवट ठरला.

हू जिंताओ हे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या शेजारील खुर्चीवर बसलेले होते आणि दोन गार्डस् आले. त्यांनी जिंताओ यांना खुर्चीवरून बळजबरीने उठविले आणि ‘ग्रेट हॉल ऑफ दी पीपल’बाहेर काढले. दोन्ही गार्ड आले, ‘उठा आणि बाहेर व्हा’ म्हणाले, जिंताओ चकित
झाले. त्यांनी एक कटाक्ष जिनपिंग यांच्याकडे टाकला. जिनपिंग गालातल्या गालात हसत होते. जिंताओ उठत नव्हते. मग एका गार्डने त्यांच्या बगलेत हात घातला. आपण बाहेर पडलो नाही तर आपल्याला उचलून बाहेर काढले जाईल, हे दोन्ही गार्ड आणि जिनपिंग यांच्या देहबोलीवरून जिंताओंच्या लक्षात आले.

ते उठताना जिनपिंग यांना उद्देशून काहीतरी म्हणाले, जिनपिंग यांनी त्यांच्याकडे पाहून एक विजयी हास्य तेवढे दिले. गार्डस्नी जिंताओंना बाहेर काढले. अधिवेशनात सहभागी असलेल्या दोन हजारांवर पदाधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर जणू काहीच घडले नाही, असे भाव होते.

आजीवन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग : सर्वांत शक्तिशाली नेते!

2012 मध्ये जिनपिंग सत्तेवर आले. जिनपिंग यांच्या आधी राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या सर्व नेत्यांना पाच वर्षांच्या दोन टर्मसाठी किंवा वयाच्या
68व्या वर्षी निवृत्त व्हावे लागले. 2018 मध्ये चीनने अध्यक्षपदासाठी दोन टर्मची मर्यादा रद्द केली. जिनपिंग आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष राहू शकतात. जिनपिंग यांच्या विरोधात वक्तव्य करणेही 2021 मध्ये गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत आले.

2023 मध्ये जिनपिंग यांचा दुसरा कार्यकाळ संपत आहे, पण चीनमध्ये केवळ कमाल दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची अटच काढलेली नाही,
तर जिनपिंग यांची दुसर्‍यांदा पक्षप्रमुख म्हणूनही निवड झालेली आहे. जिनपिंग यांचे विचार चीनच्या राज्यघटनेचा भाग बनले आहेत.

हू जिंताओ कोण?

हू जिंताओ हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 2013 मध्ये शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी, जिंताओ 10 वर्षे चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. पद सोडलेले असले तरी त्यानंतरही ते पक्षाच्या बैठकांना हजेरी लावत असत.

या चौघांची हकालपट्टी पंतप्रधान ली केक्यांग- शांघाय पक्षाचे प्रमुख हान झेंग – पक्षाचे सल्लागार प्रमुख वांग यांग – पीपल्स काँग्रेसचे प्रमुख ली झांशू जिनपिंग यांचे वारस म्हणून दावेदार ली केक्यांग – डिंग झ्युएक्सियांग – चेन मिनेरो, हू चुनहुआ

Chinese President Jinping : ‘नो टू ग्रेट लीडर’ पोस्टरमुळे चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष जिनपिंग यांच्‍या ‘हुकूमशाही’विरोधात संतापाची लाट

China Border : चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशमधील दोन तरुण बेपत्ता

Back to top button