Diwali Festival : निश्चिंतपणे उत्साहात दिवाळी साजरी करा, अखनूरमध्ये जवानांकडून दिवाळी साजरी, देशवासियांना शुभेच्छा | पुढारी

Diwali Festival : निश्चिंतपणे उत्साहात दिवाळी साजरी करा, अखनूरमध्ये जवानांकडून दिवाळी साजरी, देशवासियांना शुभेच्छा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : अखनूरमध्ये जवानांकडून दिवे लावून एलओसी बॉर्डरवर दिवाळी साजरी करण्यात आली. त्याचे फोटो भारतीय लष्कराकडून टाकण्यात आले. यावेळी जवानांनी फटाकेही वाजवले.

Diwali Festival : दिवाळी हा भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आहे. दिवे लावणे, फटाके वाजवणे, लाडू, चकली, करंजी, अनारसे असा फराळ घरोघरी केला जातो. घरापासून लांब राहणारे आपले मित्र आप्तेष्ट नातेवाईक या सणासाठी घरी परतात. सर्व मिळून दिवाळी साजरी करतात. मात्र, सीमेवर लढणारे जवान अहोरात्र पहारा देत असतात. त्यांच्यासाठी बॉर्डर हेच घर असते. घरी जाऊन नातेवाईकांसह दिवाळी साजरी करण्याचा अनुभव त्यांना खूप कमी वेळा घेता येतो. मात्र, तरीही जवान सीमेवर अतिशय आनंदाने सतत पहारा देतात.

अशावेळी जेव्हा ‘सीमा’ हेच जवानांचे घर असते. तिथेही जवान अतिशय आनंदाने सर्वजणांसोबत दिवाळी साजरी करतात. अखनूरमध्ये एलओसीवर धनत्रयोदशीनिमित्त जवानांनी अतिशय उत्साहात पारंपारिक पद्धतीने दिवे लावले. तसेच फटाके वाजवत दिवाळी उत्सव साजरा केला.

Diwali Festival : यावेळी एका जवानाने म्हटले आहे की, मी माझ्या देशवासियांना एवढेच सांगेन की तुम्ही निश्चिंत होऊन आनंदाने जल्लोषात दिवाळी उत्सव साजरा करा.

तर COL इकबाल सिंग म्हणाले, मला कर्नल इक्बाल सिंग म्हणाले, “मी देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की आमचे सैनिक सतर्क आहेत आणि सीमेवर जागरुक आहेत.”

हे ही वाचा :

Diwali Festival : नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण का करावे?

 

Back to top button