Noida Couple Filming In OYO : हॉटेलमध्ये जोडप्यांच्या ‘त्या’ क्षणांचे चित्रीकरण, टोळीचा पर्दाफाश | पुढारी

Noida Couple Filming In OYO : हॉटेलमध्ये जोडप्यांच्या ‘त्या’ क्षणांचे चित्रीकरण, टोळीचा पर्दाफाश

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ओयो हॉटेलमध्ये थांबणाऱ्या जोडप्यांचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रीकरण करणाऱ्या आणि त्यानंतर त्या व्हिडिओच्या सहाय्याने त्यांना ब्लॅक मेल करणाऱ्या ४ जणांच्या टोळीचा नोयडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने हॉटेलमधील खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावले होते. त्याद्वारे तेथे थांबणाऱ्या जोडप्यांच्या खासगी क्षणांना चित्रीत केले जात होते. यानंतर पीडित जोडप्यांकडून पैसे मागितले जात. पैसे देण्यास नकार दिला तर तो व्हिडिओ ऑनलाईन प्रसारित करण्याची धमकीही या चौघांकडून दिली जात असल्‍याची माहिती तपास समोर आली आहे. (Noida Couple Filming In OYO)

हॉटेलमधील रुम्समध्ये छुपे कॅमेरे

याबाबत पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, या लोकांनी हॉटेलमधील रुम्समध्ये छुपे कॅमेरे लावले होते. त्याद्वारे ते जोडप्यांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवत होते. या व्हिडिओचा वापरकरुन संबधित जोडप्यांना ब्लॅकमेल केले जात होते. यासाठी या लोकांनी एक छोटेखानी कॉल सेंटर सुद्धा सुरु केले होते. यावेळी या लोकांकडून पोलिसांनी ११ लॅपटॉप, २१ मोबाईल फोन, २२ एटीएम कार्ड, २६ सिम कार्ड, ४९ बनावट ओळखपत्र, बनावट आधार कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी विष्णू सिंह, अब्दुल वहाव, पंकज कुमार आणि अनुराग कुमार यांना ताब्यात घेतले आहे. (Noida Couple Filming In OYO)

 व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल, धमकी देत युवतीकडून लाटले पैसे

यावेळी पोलिसांनी सांगितले की, याबाबत एका युवतीने तक्रार दाखल केली होती. तिने फिर्यादी नोंदवले की, तिला तिच्या प्रियकारासोबतची काही व्हिडिओ दाखवून या लोकांनी ब्लॅकमेल केले गेले. या युवतीकडून आरोपींनी दीड लाखांची मागणी केली होती. सुरुवातीला पीडित तरुणीने या लोकांना घाबरुन १७ हजार रुपये दिले होते. त्यानंतर या लोकांनी आणखी पैशांची मागणी केली. पैसे नाही दिलेस तर तुझा व्हिडिओ ऑनलाईन टाकून सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली. (Noida Couple Filming In OYO)

आरोपींनी ब्लॅकमेलिंगसह  बनावट कॉलसेंटरच्या आधारे युवकांना नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे देखील काम करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. या शिवाय हे आरोपी लोकांचे आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करुन बँकेत खाते उघडत होते व ब्लॅकमेलिंगची रक्कम अशा खात्यांमध्ये ट्रान्सफर करत होते.

अधिक वाचा :

Back to top button