Gold prices Today | धनत्रयोदशीला सोने झाले स्वस्त, खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या दर | पुढारी

Gold prices Today | धनत्रयोदशीला सोने झाले स्वस्त, खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या दर

Gold prices Today : आज धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस (Dhanteras). धनत्रयोदशी दिवशी सोने- चांदीची खरेदी करण्याची परंपरा आहे. आज धनत्रयोदशी दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, आज शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,४४० रुपयांवर आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२४० रुपये आहे. दरम्यान, चांदीचा दर वाढला असून तो प्रति किलो दर ५७,७०० रुपयांवर पोहोचला आहे.

मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५०,४४० रुपये आहे. तर येथे २२ कॅरेट सोने ४६,२४० रुपये आहे. दिल्लीत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५०,५९० रुपये आणि ४६,३४० रुपये आहे. चेन्नईत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५०,८९० रुपये आणि ४६,६४० रुपये आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे चांदीचा प्रति किलो दर ५७,७०० रुपये आहे. तर चेन्नई, बंगळूर आणि हैदराबादमध्ये चांदीची दर ६१,५०० रुपये आहे.

स्विस सीमाशुल्कच्या डाटानुसार, चीन आणि भारत या प्रमुख बाजारपेठांमध्ये स्विस सोन्याची निर्यात सप्टेंबरमध्ये वाढली आहे. तुर्कस्तानमध्येही सोन्याची मागणी वाढत चालली आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मुल्य, जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पुरवठा साखळीतील अडचणी आदी अनेक घटकांवर सोन्याचे दर अवलंबून असतात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. मार्च २०२२ मध्ये सोन्याचा भाव ५५ हजारांवर गेला होता. आता हा भाव ५० हजारांवर आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. (Gold prices Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button