Netflix : नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करण्याची सुविधा करणार बंद | पुढारी

Netflix : नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करण्याची सुविधा करणार बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्स मोफत पासवर्ड शेअरिंगची सुविधा बंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कंपनीने अलीकडेच चिली, कोस्टा रिका आणि पेरू येथे राहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ‘अतिरिक्त सदस्य जोडा’ पर्याय लाँच केला आहे. या फीचर अंतर्गत यूजरच्या घराबाहेरील लोकांना पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. सध्या हे फीचर भारतात सुरू झालेले नाही.

तसेच नेटफ्लिक्स या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने इतर काही प्रदेशांमध्ये ‘अॅड अ होम’ फिचर्सची घोषणा केली आहे. Netflix ने अर्जेंटिना, डोमिनिकन रिपब्लिक, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि होंडुराससह अनेक देशांमध्ये अॅड-अ-होम पर्यायाची चाचणी सुरू केली आहे. नेटफ्लिक्सने अद्याप भारतातील वापरकर्त्यांना पासवर्ड शेअर करणे व करण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

यापूर्वी, कंपनीने सूचित केले होते की, ते वर्षाच्या अखेरीस सर्व वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स खाते पासवर्ड शेअर करण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करेल. त्यामुळे कंपनी येत्या काही महिन्यांत भारतात ‘अॅड अ होम’ (‘Add A Home’) सारखे फिचर्स आणू शकते.

नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग होणार बंद

पुढील महिन्यापासून नवीन ‘Add A Home’ बटण दिसेल. एकदा हे फिचर्स आणल्यानंतर, वर नमूद केलेल्या देशांमधील प्रत्येक नेटफ्लिक्स खात्यामध्ये एक घर समाविष्ट असेल, जेथे एकाच घरात राहणारे कोणीही कोणत्याही डिव्हाइसवर नेटफ्लिक्स वापरू शकतात. ते प्रवासात सुद्धा नेटफ्लिक्स पाहू शकतात. तुम्ही एखाद्याला तुमचे Netflix खाते दुसर्‍या घरात वापरण्याची परवानगी देऊ इच्छित असल्यास, तुम्हाला शुल्क भरावे लागेल. मात्र, भारतात यासाठी किती शुल्क भरावे लागेल, याबाबत कोणतीही माहिती नाही.

अधिक वाचा :

Back to top button