Latest
Political Diwali : मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्या मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन
मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी साजरा होणार दीपोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या राज्यातील दिग्गज नेत्यांनी कार्यकर्त्यांसह राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावलीच्या निमित्ताने हे तिन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र आल्याने याकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. या तिघांनी एकत्र येत राजकीय दिवाळी साजरी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या तिघांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. (Political Diwali)

