Stock Market Updates | शेअर बाजारात तेजी कायम, पण डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण

Stock Market Updates | शेअर बाजारात तेजी कायम, पण डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण
Published on
Updated on

Stock Market Updates : तेलाच्या किमतीत झालेली घट आणि मजबूत कॉर्पोरेट अहवालानंतर अमेरिकेचा न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ‍वधारल्याचे चांगले परिणाम बुधवारी भारतीय शेअर बाजारात दिसून आले. यामुळे बुधवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजी कायम राहिली. सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टी वधारला. बुधवारी सेन्सेक्स १४६ अंकांनी वधारुन ५९,१०७ वर बंद झाला. तर निफ्टी २५ अंकांनी वाढून १७,५१२ वर बंद झाला. एकूणच बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत असून सेन्सेक्सची झेप ६० हजारांच्या दिशेने सुरु आहे.

जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आणि तेलाचा ग्राहक असलेल्या भारताला कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचा फायदा होतो. कारण त्यामुळे आयात महागाई कमी होते. निफ्टीवर Nestle India Ltd आणि Ultratech Cement Ltd यांचे शेअर्स अनुक्रमे ०.२ टक्के आणि ०.८ टक्क्याने वाढले.

रुपयाची घसरण निचांकी पातळीवर

दरम्यान, बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ८२.७७ ची निचांकी पातळी गाठली. मागील सत्रात रुपया प्रति डॉलर ८२.३६ वरून ८२.७७ वर गेला होता. आज बुधवारी त्याची विक्रमी घसरण झाली.

आशियाई शेअर बाजारात तेजी

बुधवारी आशियाई शेअर बाजारात तेजी होती. टोकियोचे शेअर्स बुधवारी उच्च पातळीवर खुले झाले. बेंचमार्क Nikkei २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात ०.३५ टक्के म्हणजेच ९५.५६ अंकांनी वाढून २७,२५१.७० वर पोहोचला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.१२ टक्के म्हणजेच २.३१ अंकांनी वाढून १,९०३ वर पोहोचला.

क्रिप्टोकरन्सी घसरल्या

बुधवारी सकाळी क्रिप्टोकरन्सीच्या किमती पुन्हा घसरल्या. यामुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ०.५९ टक्क्यांनी घसरले. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९२९.०३ अब्ज डॉलरवर आले आहे. बिटकॉइन १९,३१६ वर व्यवहार करत आहे आणि त्यात १.१२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्कचे मूळ टोकन इथर १.९१ टक्क्यांनी घसरुन १,३०६ डॉलरवर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates)

आशियाई बाजारातील तेजी तसेच आरबीआयने महागाई कमी होण्याचे दिलेले संकेत यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार वधारला होता. काल मंगळवारी (दि.१८) सेन्सेक्स ५४९ अंकांनी वधारून ५८.९६० वर बंद झाला होता. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १७,४८६ वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news