Stock Market Today : आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे. पण भारतीय शेअर बाजारात याचे पडसाद दिसून आले नाहीत. शुक्रवारी सकाळी प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स १०० अंकांवर वधारला. तर निफ्टी १७,५९० च्या वर होता. त्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढून ५९,४०० वर खुला झाला. तर निफ्टी ६४ अंकांनी वधारून १७,६०० वर व्यवहार करत आहे.
आशियाई शेअर्स शुक्रवारी घसरले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आणखी व्याजदर वाढीची शक्यता आणि मंदीच्या जोखमीने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या आहे. यामुळे आशियाई बाजारात घसरण झाली आहे. शुक्रवारी सिंगापूर एक्सचेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ९.५ अंक म्हणजेच ०.०५ टक्क्यांनी घसरून १७,५१० वर आला. तर टोकियोचे शेअर्स शुक्रवारी घसरले. बेंचमार्क Nikkei २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात ०.३७ टक्के म्हणजेच १०१ अंकांनी घसरून २६,९०५ वर आला. तर Topix निर्देशांक ८.३७ अंकांनी खाली येऊन १,८८७ वर व्यवहार करत होता.
शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होत्या. चीन हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागांत लॉकडाऊन आहे. यामुळे चीनमधून तेलाची आयात कमी झाली आहे.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया गुरुवारी २१ पैशांनी घसरून ८२.७९ वर बंद झाला होता. तर सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ५९,२०२ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५१ अंकांनी वाढून १७,५६३ वर बंद झाला होता. जूनच्या तिमाहीत नफ्यात २२ टक्के घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एशियन पेंट्सचे शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक घसरले होते. (Stock Market Today)
हे ही वाचा :