Firecracker Ban : फटाके खरेदीचे पैसे मिठाईवर खर्च करा : दिल्‍लीतील ‘फटाके बंदी’वर सुप्रीम कोर्टाची स्‍पष्‍टोक्‍ती

सर्वोच्‍च न्‍यायालय संग्रहित छायाचित्र.
सर्वोच्‍च न्‍यायालय संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली सरकारने येत्या 1 जानेवारी 2023 पर्यंत फटाके फोडण्यास, त्याची विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातलेली आहे. ( Firecracker Ban )  यावर दाखल याचिकेवर तत्‍काळ सुनावणीस आज दि. २० सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. तसेच नागरिकांना स्‍वच्‍छ आणि खुल्‍या हवेत श्‍वास घेवू द्‍या, तुमचे फटाके खरेदीचे पैसे मिठाईवर खर्च करा, असेही न्‍यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले.

दिल्‍लीत फटाके खरेदी आणि विक्री तसेच फटाके फोडण्‍याचे उल्‍लंघन कल्‍यास २०० रुपये दंड आणि ६ महिने कारावासाची शिक्षेची तरतूद करण्‍यात आली आहे. सरकारच्‍या केजरीवाल सरकारने घातलेल्या फटाके बंदीला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली होती. यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. फटाका  बंदीसंदर्भातील बऱ्याच याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यामुळे या विषयावर आम्ही निर्णय देऊ इच्छित नाही, असे उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते.

दिल्ली सरकारने येत्या 1 जानेवारी 2023 पर्यंत फटाके फोडण्यास, त्याची विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातलेली आहे. हवेच्या वाढत्या प्रदुषणाचे कारण यासाठी दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिलेले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news