Andheri East bypoll : पराभवापेक्षा पळ काढणे भाजपनं मंजूर केलं; नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा | पुढारी

Andheri East bypoll : पराभवापेक्षा पळ काढणे भाजपनं मंजूर केलं; नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋतुजा लटके यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरायला अडथळे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवायची होती तर आधीच दाखवायला हवी होती. आता पराभव दिसत असल्याने हे उशिरा आलेलं शहाणपण आहे! असं ट्विट करत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Andheri East bypoll )

गेले काही दिवस अंधेरी पूर्व विधानसभा पाेटनिवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात लढत होईल असं चित्र होते. एकीकडे ऋतुजा लटके यांच्या राजीनामा मंजुरीत अडथळे येत होते. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला. आणि  निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन्ही गटाकडून उमेदवारीचे अर्ज शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरण्यात आले. अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, त्यानंतर त्यांच अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारीबाबत पत्र लिहणं., त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज नागपूरमध्‍ये अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीतील भाजप माघार घेणार अशी घोषणा अशा घडामोडी घडल्या.

 उशिरा आलेलं शहाणपण 

भाजपाच्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीतील माघारीवर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्रीमती ऋतुजा लटके यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरायला अडथळे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवायची होती तर आधीच दाखवायला हवी होती. आता पराभव दिसत असल्याने हे उशिरा आलेलं शहाणपण आहे!

हेही वाचलंत का?

Back to top button