डीआरडीओ: DRDO बनवत आहे 200 किमीवर मारा करणारी 'इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेलगन' तोफ, भारताच्या तिन्ही दलांची वाढणार ताकद | पुढारी

डीआरडीओ: DRDO बनवत आहे 200 किमीवर मारा करणारी 'इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेलगन' तोफ, भारताच्या तिन्ही दलांची वाढणार ताकद

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने आपले पूर्ण लक्ष भविष्यात होणाऱ्या युद्धांवर केंद्रित केले आहे. अशा परिस्थितीत लष्करासाठी युद्धसामग्री, शस्त्रास्त्रेही त्याच पद्धतीने पुरवली जात आहेत. दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनेही (DRDO) भविष्यातील शस्त्रांवर काम करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये डीआरडीओ असे काही शस्त्र (‘रेलगन’) बनवत आहे, ज्यामुळे भारतीय वायूदल, भूदल व नौदल या तिन्ही दलांची ताकद (डीआरडीओ) वाढवणार आहे.

डीआरडीओने इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेल गन बनवण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त समजत आहे. ही एक अशी ‘रेल गन’ आहे, जी भविष्यात होणाऱ्या युद्धासाठी तयार केली जात आहे. ही २०० किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. आगामी काळात ही ‘रेल गन’ भारतीय लष्करात सामील झाल्यास तिन्ही दलाची ताकद (डीआरडीओ) वाढविण्यास मदत करणार आहे.

डीआरडीओने ट्विट करून दिली माहिती

DRDO ने ट्विट करून ‘रेल गन’ चे काम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पुण्यातील त्यांच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई) प्रयोगशाळेत यावर काम सुरू झाले आहे. भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांसाठी हे भविष्यातील महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे, असेही डीआरडीओने म्हटले आहे.

‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेलगन’ची वैशिष्टये

पुण्यातील एआरडीई प्रयोगशाळेत ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन बनवण्यास सुरुवात झाली आहे. या तोफेचे वैशिष्टय़ म्हणजे ती 200 किमी अंतरावरून मारा करू शकते. त्यात गनपावडर ऐवजी इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड वापरण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये विद्युत प्रवाहाद्वारे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार केले जाते. त्‍यामुळे रेलगनमध्ये असलेला तोफेचा गोळा ध्‍वनीच्‍या वेगापेक्षा ६ते ७ पट अधिक वेगाने बाहेर येते.

हेही वाचा:

 

Back to top button