'एमआरएसएएम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी | पुढारी

'एमआरएसएएम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी झाली.  ही चाचणी ओडिशा येथील बालासोरमध्ये करण्यात आली, अशी  माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्‍थेच्‍या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली.

‘डीआरडीओ’ने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ओडिशाच्या बालासोर येथून सकाळी 10.30 वाजता एमआरएसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

ब्रम्होस नंतर दुसरी यशस्वी चाचणी

भारताने अंदमान आणि निकोबारमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने इस्रायलच्या IAI कंपनीच्या सहकार्याने केले.

काय आहे एमआरएसएएम (Medium Range Surface to Air Missile)

मध्‍यम पल्‍ल्याचे जमिनीवरुन हवेत मारा करणारे एमआरएसएएस क्षेपणास्‍त्राचे वजन 275 किलो आहे. त्याची लांबी 4.5 मीटर असून व्यास 0.45 मीटर आहे. प्रक्षेपणानंतर याचा धूर कमी येतो.

हेही वाचा 

Back to top button