DRDO SAG recruitment 2021 : अर्ज कसा कराल? - पुढारी

DRDO SAG recruitment 2021 : अर्ज कसा कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : DRDO SAG recruitment 2021 : संरक्षण मंत्रालय अंतर्गत डीआरडीओ वैज्ञानिक विश्लेषण गटाने कनिष्ठ संशोधन फेलो ९ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीसाठी क्रिप्टोलॉजी क्षेत्रात काम करण्यासाठी अर्जदारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवस आहे. ही जाहिरात १८ सप्टेंबर रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित झाली आहे.

DRDO SAG recruitment 2021 : वयोमर्यादा

वर नमूद केलेल्या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा जाहिरातीच्या शेवटच्या तारखेनुसार २८ वर्षे असावी. एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट आहे.

अधिसूचनेनुसार उमेदवारांना वेतन ३१ हजार आणि HRA आणि वैद्यकीय सुविधांचे मासिक वेतन दिले जाईल. १५ हजार आकस्मिक अनुदान देखील स्वीकार्य आहे.

DRDO SAG recruitment 2021: अर्ज कसा करावा?

  • स्टेप १ – सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जा.
  • स्टेप २ – ‘Apply online’ लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3- स्वतःची नोंदणी करा.
  • स्टेप ४ – आता स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • स्टेप ५- आता ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करा करें.
  • स्टेप ६ – भविष्यातील संदर्भासाठी आपण अर्जाची प्रिंट घेऊ शकता.

हे ही वाचलं का?

 

Back to top button