Tamil Nadu Murder : रोहितच्या फॅननं RCB ची उडवली खिल्ली; म्हणून विराटच्या फॅननं केला खून, बॅटनं डोकं फोडलं | पुढारी

 Tamil Nadu Murder : रोहितच्या फॅननं RCB ची उडवली खिल्ली; म्हणून विराटच्या फॅननं केला खून, बॅटनं डोकं फोडलं

 पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपर्यंत आपण क्रिकेटप्रेमींच प्रेम वेगवेगळ्या स्वरुपात पाहत आलो आहे. पण आपल्या आवडत्या क्रिकेटरची खिल्ली उडवली म्हणून खून ( Tamil Nadu Murder) करण्या इतपत प्रेम! हो अशीच घटना एक घडली आहे. तमिळनाडू मध्ये. क्रिकेटर रोहित शर्माच्या फॅनने RCB ची खिल्ली उडवली. याचा राग विराट कोहलीच्या फॅनला आला. आणि ” खिल्ली का उडवली” म्हणून त्याने डोक्यात बॅट घालत त्याचा खून केला.

तमिळनाडू राज्यातील अरियालूर जिल्ह्यातील क्रिकेटर रोहित शर्माच्या फॅनला आरसीबी टीमची चेष्टा करणं चांगलचं महागात पडलं आहे. आरसीबीची चेष्टा केली म्हणून रागाने एकाने आपल्या मित्राचा खून केला. या (Tamil Nadu Murder) आरोपीला पोलिसांना अटक केली आहे.

 Tamil Nadu Murder
Tamil Nadu Murder

 Tamil Nadu Murder : मित्रानेच केला खून

पोलिसांच्या माहितीनूसार, धर्मराज (वय २१) आणि विघ्नेश (वय २४) हे दोघे मित्र आहेत. विघ्नेश हा रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. तर धर्मराज हा विराट कोहली आणि आरसीबीचा फॅन आहे. ते दारु पित बसले होते. नशेत ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावरुन चर्चा करत होते. यावेळी विघ्नेशने आरसीबी टीमवरुन चेष्टा केली. याचा राग विघ्नेशला आला. धर्मराजने रागाच्या भरात विघ्नेशचा खून केला. त्याने दारुची बाटली विघ्नेशच्या डोक्यात घातली. त्यानंतर बाजूची बॅटही डोक्यात घातली. आणि तो तिथून निघून गेला. सकाळी तिथून जाणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास विघ्नेशचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना याबद्दल कळवलं. माहितीनूसार विघ्नेशचं आयटीआयचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तो लवकरचं नोकरीसाठी सिंगापूरला जाणार होता. पुढील तपास पोलिस करतं आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button