Byju’s cut off employees : पुढील सहा महिन्यात ‘बायजू’ करणार २५०० कर्मचाऱ्यांची कपात | पुढारी

Byju's cut off employees : पुढील सहा महिन्यात ‘बायजू’ करणार २५०० कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : प्रायव्हेट शिक्षण कंपनी बायजू (Byju’s) मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात ५ टक्के मनुष्यबळ कमी करण्याची योजन बायजूने आखली आहे. म्हणजे अंदाजे २५०० कर्मचाऱ्यांचा नोकऱ्यांवर गदा येणार आहे. टेक्नॉलॉजी विभागासह सर्व विभागातील कर्मचारी कमी करण्याचा मानस कंपनीने ठेवला आहे. बायजूजकडे जवळपास ५० हजार हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. (Byju’s cut off employees)

कंपनीला झाला मोठा तोटा (Byju’s cut off employees)

गेल्या आर्थिक वर्षात बायजूच्या तोट्याने विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 4,588 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १९ अधिक होता. त्याचबरोबर महसुलातही घट झाली आहे.

बायजू करणार १०००० शिक्षकांची भरती

Byju’s च्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांच्या मते, कंपनी परदेशात ब्रँडिंग करण्यावर भर देईल. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण १० हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गोकुळनाथ म्हणाल्या की, आम्ही नफ्यासाठी एक मार्ग आखला आहे जो आम्ही मार्च 2023 पर्यंत साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Byju’s cut off employees)

संपूर्ण भारतात २०० हून अधिक सक्रिय केंद्रे असल्याचा कंपनीचा दावा आहे. या वर्षाच्या अखेरीस ते 500 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुढे गोकुळनाथ असे ही म्हणाल्या, “ही नवीन योजना आम्हाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि अनावश्यक गोष्टी टाळण्यास मदत करेल. आमचे हायब्रीड लर्निंग मॉडेल – ‘ट्यूशन सेंटर’ आणि आमचे ‘ऑनलाइन लर्निंग मॉडेल’ जे बायजूचे क्लासेस किंवा आमचे ‘लर्निंग अॅप’ आहे. या करिता विशेषतः आम्ही आमच्या पहिल्या दोन उत्पादनांसाठी 10,000 शिक्षकांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहोत.


अधिक वाचा :

Back to top button