मुंबई; वृत्तसंस्था : अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांची संपत्ती एका वर्षात दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या वर्षात त्यांच्या संपत्तीत रोज 1 हजार 612 कोटींची भर पडली. त्यांच्या संपत्तीत जबरदस्त वाढ झाल्याने त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक डेफ बेजोस यांना मागे टाकत जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसरे स्थान पटकाविले आहे.
इंडियन इन्फोलाईन लिमिटेडच्या (आयआयएफएल) अहवालानुसार अदानी ग्रुपच्या (Gautam Adani) कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारल्याने गौतम अदानी यांची संपत्ती 116 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत 5 लाख 88 हजार 500 कोटी रुपयांची भर पडली आहे. अदानी यांची संपत्ती सध्या 10 लाख 94 हजार 400 कोटी रुपये इतकी झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत नवीन विविध उद्योगांत गुंतवणूक केल्यानंतर मोठी वाढ झाली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांची संपत्ती 1 हजार 440 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील दुसर्या क्रमांकाची सिमेंट कंपनीनुकतेच अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसी कंपन्यांना खरेदी करत सिमेंट उद्योगात पाऊल टाकले आहे. त्यांची कंपनी देशातील दुसर्या क्रमांकाची सिमेंट कंपनी बनली आहे
अधिक वाचा :