Dengue : दिल्लीत डेंग्यूचा कहर! दीड महिन्यात सापडले ९५० हून अधिक रुग्ण | पुढारी

Dengue : दिल्लीत डेंग्यूचा कहर! दीड महिन्यात सापडले ९५० हून अधिक रुग्ण

[sनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; देशाची राजधानी दिल्लीत डेंग्यूचा कहर सुरू आहे. केवळ गेल्या दीड महिन्यात ९५० पेक्षा अधिक रूग्ण राजधानीत सापडले आहेत. २०१७ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. केवळ डेंग्यूच नव्हे तर, मलेरिया आणि चिकनगुनियानेही दिल्लीकरांना हैराण केले आहे.

गत सप्टेंबर महिन्यात राजधानीत डेंग्यूचे ६९३ रुग्ण सापडले होते. तर चालू महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णसंख्येत तीनशेपेक्षा जास्तने भर पडली आहे. थोडक्यात गेल्या दीड महिन्यात रुग्ण संख्येत ९५० पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. चालू वर्षीच्या जानेवारीत महानगरात २३, फेब्रुवारीत १६, मार्चमध्ये २२, एप्रिलमध्ये २०, मे महिन्यात ३०, जूनमध्ये ३२, जुलैमध्ये २६ तर ऑगस्टमध्ये ७५ रुग्ण सापडले होते.

सुदैवाची बाब म्हणजे दिल्लीत डेंग्यूने अजुनतरी कुणाचा बळी घेतलेला नाही. याआधी २०१५ मध्ये ऑक्टोबर महिन्यात महानगरात १० हजार ६०० रुग्ण सापडले होते. १९९६ नंतरचा संसर्गजन्य आजाराचा दिल्ली शहरातील हा सर्वात मोठा आकडा आहे.

हेही वाचा:

Back to top button