PM Modi In Gujarat : गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतले कूलदेवीचे दर्शन; ‘ही’ आहे मोदी यांची कूलदेवता | पुढारी

PM Modi In Gujarat : गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतले कूलदेवीचे दर्शन; ‘ही’ आहे मोदी यांची कूलदेवता

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Gujarat) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. मागील दौऱ्यामध्ये त्यांनी ५१ शक्तीपीठांपैकी एक अशा आई अंबेचे दर्शन घेऊन पूजा केले होती. तसेच गब्बर पहाड येथे असणाऱ्या या देवीच्या महाआरतीला उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात दौऱ्याला मेहसाणा या जिल्ह्यातून सुरुवात करणार आहेत. २०१७ मध्ये ते मेहसाणा येथे गेले होते. आता मोठ्या कालावधीनंतर पंतप्रधानमंत्री आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचा जन्म याच जिल्ह्यातील वडनगर या ठिकाणी झाला होता.

देशातील पहिले सौर ऊर्जा गाव (PM Modi In Gujarat)

गुजरातच्या दौऱ्यात मेहसाणा जिल्ह्याच्या भेटी दरम्यान ते रविवारी मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर मधील लाईट ॲन्ड साऊंड शोचा शुभारंभ केला. तसेच मोढेरा या गावाला देशातील पहिले सौर ऊर्जा गाव (Solar Village)म्हणून घोषित केले. त्यामुळे मोढेरा (Modhera) या गावाचे नाव देशासह जगभरात तर झळकले आहे. पण, भारताचा एक नवा इतिहास या निमित्ताने लिहिला गेला आहे.

कूलदेवीचे दर्शन (PM Modi In Gujarat)

मोढेरा येथे असणाऱ्या आपल्या कूलदेवीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेतले. मोढेरा गावात असणारी श्री मातंगी मोढेश्वरी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांची कुलदैवत आहे. श्री मातंगी देवीचे येथील मंदिर १६ व्या शतकातमध्ये बनविण्यात आले होते. येथील अशी आख्यायिका आहे की, आई मोढेश्वरीने आपल्या १८ भूजाने कर्नाट नावच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या दहशतीपासून येथील जनतेला मूक्त केले. मोढेश्वरी मातेच्या प्रत्येक हातामध्ये एक हत्यार आहे. ज्यामध्ये त्रिशुल, खडग, तलवार सह इतर हत्यारे आहेत. या मंदिरात मोढेश्वरीचे हेच रुप भाविकांना पहावयास मिळते.

श्री मोढेश्वरीचे मंदिर ये सूर्य मंदिराजवळच आहे. अजून एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, श्री राम यांनी या ठिकाणी पूजा केली होती. इतिहासतज्ज्ञ असे सांगतात की, पूर्वी मोढेराचे नाव मोहरपूर असे होते.


अधिक वाचा :

Back to top button