पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात (Gujrat) सीमेजवळील अरबी समुद्रात सात भारतीय मच्छीमारांचे (Indian Fishermen) अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी २० ते २५ पाकिस्तानी नौदलाच्या जवानांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबार करून मच्छीमारांच्या बोटीचे नुकसान करणे, मच्छीमारांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली.
६ ऑक्टोबर रोजी सात मच्छीमार एका बोटीमधून भारतीय हद्दीतील जखाऊ किनाऱ्यावर मासेमारी करत हाेते. याचदरम्यान पाकिस्तानी नौदलाच्या बोटीतून पहारा देणाऱ्या २० ते २५ जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंर बोट हळूहळू बुडायला सुरूवात झाली होती. (Indian Fishermen)
दरम्यान पाक नौदलांनी या बोटीमधील सर्व मच्छीमारांचे अपहरण करून त्यांच्या जहाजात नेले. त्यानंतर संबंधित मच्छीमारांना मारहाण करण्यात आली. त्यांना गंभीर दुखापत झाली. या मारहाणीचा एक व्हिडिओ या पाकिस्तानी सैन्याने केला आहे. या व्हिडिओमध्ये मच्छिमारांना धमकी देत असल्याचे देखील दिसून येत आले. मारहाण करत धमकी देत असल्याची व्हिडीओ व्हायरल करून मच्छीमारांना सोडून देण्यात आले.
या प्रकरणी पोरबंदर पोलीस अधीक्षक रवी मोहन सैनी म्हणाले, " मच्छीमारांची पाकिस्तान नाैदलाच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीद्वारा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर अपहरण केलेल्या सर्व मच्छीमारांना आणले. या प्रकरणीजखाऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल इतके कार्यक्षेत्र पोरबंदर पोलीस स्टेशनचे आहे. त्यामुळे हे प्रकरण पोरबंदर स्टेशनकडे सोपविण्यात आले आहे".
हेही वाचा