सरन्यायाधीश पदासाठी नाव सूचवा; केंद्र सरकारची उदय लळीत यांना विचारणा | पुढारी

सरन्यायाधीश पदासाठी नाव सूचवा; केंद्र सरकारची उदय लळीत यांना विचारणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; देशाच्या भावी सरन्यायाधीश पदासाठी नाव सूचवा, अशी विचारणा केंद्र सरकारने विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांना केली आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने याबाबतचे पत्र लळीत यांना पाठविले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या लळीत यांच्यापाठोपाठ न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस लळीत यांच्याकडून केली जाण्याची शक्यता जास्त आहे.

काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या लळीत यांना कमी कालावधी मिळालेला आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी सरकारला नवीन सरन्यायाधीशाची नेमणूक करावी लागणार आहे. एकदा का सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस झाली की कॉलिजियमच्या बैठका होत नाहीत. लळीत यांच्या नेतृत्वाखालील कॉलिजियमने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून चार न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली होती. तथापि न्यायमूर्तींच्या एका गटाने त्याला आक्षेप घेतला होता.

हेही वाचलंत का?

Back to top button