मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर | पुढारी

मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती गुरुग्राममधील मेदान्ता रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मेदान्ता रूग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्वीटरच्या माध्यमातून मुलायमसिंग यादव यांच्या प्रकृतीबाबतची माहिती देण्यात येत आहे.

दरम्यान, मुलायमसिंग यांना पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी रूग्णालयात येऊ नये, असे आव्हान समाजवादी पक्षाकडून करण्यात आले आहे. मागील काही काळापासून आजारी असलेले समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना ( दि. २ ) रविवारी गुरूग्राममधील मेदान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादव यांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

हेही वाचलंत का?

Back to top button