Bharat Jodo Yatra: सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी | पुढारी

Bharat Jodo Yatra: सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी

पुढारी ऑनलाईन: काँग्रेसची भारत जोडो यात्रा दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातून पुन्हा यात्रेला सुरूवात झाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी झाल्या आहेत.

 

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावेळी सांगितले की, विजयादशमीनंतर आता राज्यात काँग्रेसचा विजय होईल. राज्यात आमची सत्ता येणारच आहे. सोनिया गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान रस्त्यावर उतरल्या याचा आम्हाला अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button