रावण-दहन करताना मोठी दुर्घटना; लोकांच्या अंगावर कोसळला रावणाचा पेटता पुतळा | पुढारी

रावण-दहन करताना मोठी दुर्घटना; लोकांच्या अंगावर कोसळला रावणाचा पेटता पुतळा

पुढारी ऑनलाईन डेस्क:  हरियाणातील यमुना नगरमध्ये बुधवारी रात्री दसरा मैदानावर मोठी दुर्घटना टळली. शहरात बुधवारी दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 80 फूट रावणाचा पुतळा दहन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पुतळा दहन करत असताना लोकांच्या अंगावर पडला, त्यामुळे मैदानात चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या परिस्थितीची दखल घेत मैदान मोकळे केले. पोलिसांच्या माहितीनुसार घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी पुतळ्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना रोखले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या प्रकरणी यमुनानगर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलजीत यांनी सांगितले की, काही लोक रावणाच्या जळलेल्या पुतळ्याची लाकडे उचलण्यासाठी आत जात होते. दरम्यान रावणाच्या पुतळ्याची रचना ढासळली. जखमींबाबत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. दसरा मैदानात 80 फूट रावण आणि 60 फूट मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

हा अपघात का आणि कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत, मात्र आतापर्यंतच्या पुराव्यांच्या आधारे हा अपघात यंत्रणेच्या अभावामुळे घडला. मात्र, पोलिस हे सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. दसऱ्याला मोठ्या संख्येने लोक येण्याचा अंदाज होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गर्दीनुसार आम्ही तयारी केली होती. रात्री पुतळ्याचे दहन सुरू असताना सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर अचानक रावणाचा जळलेला पुतळा पाहून काही लोक त्यातून बाहेर पडलेल्या लाकडासाठी पुढे सरसावले, यादरम्यान पुतळा समोरून खाली पडला.

Back to top button