Pulwama Attack : पुलवामामध्‍ये दहशतवादी हल्‍ला, पोलीस कर्मचारी शहीद | पुढारी

Pulwama Attack : पुलवामामध्‍ये दहशतवादी हल्‍ला, पोलीस कर्मचारी शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्‍ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या ( सीआरपीएफ ) संयुक्‍त गस्त पथकावर आज दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार  केला. यामध्‍ये एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून, ‘सीआरपीएफ’चा जवान जखमी झाला आहे. सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा दिला असून, शोधमोहित तीव्र केली आहे.

पुलवामा जिल्‍ह्यातील पिंगलाना येथे दहशतवाद्‍यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्‍या संयुक्‍त गस्त पथकावर अंदाधूंद गोळीबार करत हल्‍ला केला. गोळीबार करुन दहशतवादी फरार झाले. यामध्‍ये एक पोलीस कर्मचारी आणि ‘सीआरपीएफ’चा एक जवान जखमी झाला. त्‍यांना तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र उपचार सुरु असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पोलीस आणि सीआरपीएफच्‍या संयुक्‍त पथकांनी या परिसराला वेढा देत शोध मोहिम तीव्र केली आहे.

दरम्‍यान, आज (दि.२) सकाळी शोपियानमध्‍ये झालेल्‍या चकमकीत लश्‍कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार झाला. नीसर अहमद भट असे त्‍याचे नाव आहे. तो शोपियानमधील नौपोरा येथील रहिवासी होता. त्‍याच्‍याकडून एके-४७ रायफलसहीत
स्‍फोटके जप्‍त केली आहेत. त्याचा अनेक दहशतवादी हल्‍ल्‍यात सहभागी होता. मागील चकमकीनंतर तो घटनास्‍थळावरुन पसार झाला होता.

हेही वाचा :

 

Back to top button