Malaika Arora : मलायका अरोराचे माजी पती अरबाजबाबत धक्कादायक विधान, म्हणाली... | पुढारी

Malaika Arora : मलायका अरोराचे माजी पती अरबाजबाबत धक्कादायक विधान, म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन पाच वर्षे झाली आहेत. या प्रदिर्घ काळात दोघांच्याही आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दोघांनी स्वतःसाठी नवीन जोडीदार शोधला. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज खान अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. असे असले तरी मलायका आणि अरबाज यांच्या नात्याच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात.

दरम्यान, मलायकाने (Malaika Arora) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी पती अरबाज सोबतचे आपले नाते आणि घटस्फोटानंतर दोघांचे नाते कसे आहे याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. मलायका जे बोलली ते ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. चला तर जाणून घेवूया मलायका अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल काय म्हणाली ते…

मलायका म्हणाली, घटस्फोटानंतर माझे अरबाजसोबतचे नाते पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. आमच्या नात्यातील समीकरणे चांगली झाली आणि कदाचित आम्ही पूर्वीपेक्षा अधिक शहाणे झालो आहोत. घटस्फोटानंतर आम्ही आमचे आयुष्य आनंदाने आणि शांततेने जगत आहोत, असे सांगत तिने अरबाजला एक अद्भुत व्यक्ती असल्याचा उल्लेख केला आहे.

कधी कधी लोक अद्भुत असतात. पण विविध कारणास्तव ते एकत्र राहू शकत नाहीत. अरबाजने त्याचे आयुष्य चांगले जगावे अशी माझी सदैव इच्छा असेल, अशीही भावना मलायकाने व्यक्त केली. अरबाज खान सोबतच्या घटस्फोटाबद्दल मलायका म्हणाली, मी स्वतःला प्रथम स्थान दिले आणि म्हणूनच आज मी पूर्वीपेक्षा चांगली व्यक्ती बनले आहे. मुलगा अरहानसोबतही माझे चांगले नाते आहे आणि तो हे सर्व जबाबदारीने पाहू शकतो. माझे अरबाज खानसोबतही चांगले संबंध आहेत. मी स्वतःसाठी उभी राहिली याचा मला खूप आनंद आहे. महिलांनी नेहमी त्यांच्या हृदयाचे ऐकले पाहिजे आणि त्यांचे मन जे सांगेल तेच करावे., असेही मलायकने व्यक्त केले.

मलायका (Malaika Arora) आणि अरबाज यांचे 1998 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 18 वर्षानंतर मलायका आणि अरबाजने 2017 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याचा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. अरबाजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

Back to top button