Kerala Court : अल्पवयीन मुलीवर अत्याचार : केरळमधील कोर्टाने आरोपीस सुनावली तब्बल १४२ वर्षांची शिक्षा | पुढारी

Kerala Court : अल्पवयीन मुलीवर अत्याचार : केरळमधील कोर्टाने आरोपीस सुनावली तब्बल १४२ वर्षांची शिक्षा

तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला केरळमधील जिल्‍हा न्यायालयाने १४२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो प्रकरणात दोषी असणाऱ्याला सुनावण्यात आलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे. कारावासाच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने दोषीला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. (Kerala Court)

जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पथनमथिट्टा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जयकुमार जॉन यांनी आरोपी आनंदन पीआरला 142 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्याला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. जिल्ह्यातील पॉक्सो प्रकरणात दोषीला झालेली ही सर्वाधिक शिक्षा आहे. (Kerala Court)

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोषी हा 10 वर्षीय पीडितेचा नातेवाईक आहे. बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 506 अंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले. आरोपीने २०१९-२०२१ मध्ये मुलीचे लैंगिक शोषण केले. आरोपीने ही घटना त्यांच्या घरी असताना केली. (Kerala Court)

सावत्र मुलीवर अत्याचार प्रकरणी 30 वर्षांचा तुरुंगवास (Kerala Court)

ऑगस्टच्या सुरुवातीला, केरळमधील एका जलदगती न्यायालयाने अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पॉक्सो कायद्यातंर्गत ३० वर्षांची शिक्षा सुनावली होती. या केसचे कामकाज पहाणारे सरकारी वकील एसपीपी सनेश यांनी सांगितले, २०१८ मध्ये इडुक्की जिल्ह्यात एका ३२ वर्षांच्या नराधमाने आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर तिची आई घरात नसताना अत्याचार केला. पीडित मुलगी आणि या घटनेची साक्षीदार असणारी पीडितेची लहान बहिण यांच्या जबाबाच्या आधारे न्यायालायाने आरोपीला दोषी ठरवले हाेते.

अधिक वाचा :

Back to top button