काेल्‍हापूर : शुक्रवार पेठेतील ‘त्या’ महिलेचा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी : एका संशयिताला अटक | पुढारी

काेल्‍हापूर : शुक्रवार पेठेतील 'त्या' महिलेचा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी : एका संशयिताला अटक

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : पाडळी खुर्द येथील शेतात महिलेचा खून केल्‍याप्रकरणी नामदेव शामराव पोवार (वय ३४, रा.जोगेवाडी, ता.राधानगरी) या  संशयित आरोपीस राशिवडे बु. येथील बिरदेव मंदिराजवळ अटक करण्यात आली. खूनाची ही घटना शुक्रवारी उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.

कोल्हापूर शहरातील  शुक्रवार पेठेतील आरती अनंत सामंत यांचा गुरुवारी रात्री डोक्यात वीट घालून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान केला होता. हा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी झाल्याची चर्चा होत होती. संशयित आरोपी नामदेव पोवार याच्याकडे मयत महिला आरती हिने गुप्तधन काढून दे, म्हणून तगादा लावला होता. पोवार याला पैशाची गरज होती. आरती  इतर व्यक्तींशी बोलत असलेले आवडत नसल्यामुळे खून केल्याची कबुली संशयित आरोपी नामदेव पोवार याने दिली आहे. या प्रकरणाचा तपास करवीर पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button