Kuno National Park : गुड न्यूज! नामिबियातून आणलेली मादी चित्ता प्रेग्नेंट? | पुढारी

Kuno National Park : गुड न्यूज! नामिबियातून आणलेली मादी चित्ता प्रेग्नेंट?

पुढारी ऑनलाईन डेस्क : 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल उद्यानात (Kuno National Park) आठ चित्ते आणले होते. या आठ  8 चित्तांपैकी 3 मादी चित्ता आहेत. यातील ‘आशा’ नावाची मादी चिता प्रेग्नेंट असल्याचे संकत दिले जात आहेत. या मादी चित्तेला ‘आशा’ हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

आशा चित्ता
आशा चित्ता

17 सप्टेंबर रोजी नामिबियातून  मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल उद्यानात आठ चित्ते आणले होते. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत. विशेष बोईंग 747-400 विमानानं या चित्यांना नामिबियाहून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे आणण्यात आलं. ग्वाल्हेरहून त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं होतं. सलग 20 तासांत 8,000 किलोमीटरचा प्रवास या चित्यांनी केला होता. या चित्यांसोबत नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक होतं. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (KNP-केएनपी) पंपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो पार्कमध्ये या चित्त्यांना सोडले होते.

Kuno National Park : 55 दिवसांत ‘आशा’ प्रेग्नेंट असल्याचे निश्चित होईल

या आठ चित्त्यांना नविन ठिकाणी या चित्त्यांसाठी खास व्यवस्था केली आहे.  WII-डेहराडून आणि एमपी वन विभाग त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. कुनो येथील चित्ता प्रकल्पाचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आशा प्रेग्नेंट असल्याची सर्व लक्षणे दिसत आहेत. तिचे वर्तन, शारीरिक आणि हार्मोनल बदलांनी गर्भधारणेची बदल दिसत आहेत.  चित्ता प्रकल्पाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की पण याची खात्री होण्यासाठी आम्हाला काही आठवडे वाट पाहावी लागेल.  साधारणपणे ५५ दिवस लागतात.

हेही वाचलंत का?

Back to top button