G-II 2022 : इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ४० व्या स्थानावर; नव-नवीन कल्पनांना मिळणार दुजोरा | पुढारी

G-II 2022 : इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ४० व्या स्थानावर; नव-नवीन कल्पनांना मिळणार दुजोरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लोबल इनोवेशन इंडेक्स २०२२ मध्ये (G-II 2022) भारताने ४० वे स्थान प्राप्त केले आहे. यंदाच्या या निर्देशांकावरून असे दिसून येते की, नव-नवीन कल्पनांना दुजोरा मिळेल अशी स्थिती आहे. त्यामुळे स्टार्टअपसाठी सध्या देशात चांगले वातावरण तयार झाले आहे

इनोव्हेशन म्हणजेच नाविन्यतेबाबतच्या या निर्देशांकात (G-II 2022)  भारताची गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी पहायला मिळत आहे. २०१५ च्या काळात ही स्थिती खूप बिकट होती. २०२१ मध्ये ४६ वे स्थान मिळवले होते त्यांनंतरची सध्याची ही आकडेवारी पाहता याचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतील.

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताने आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. २०१५ साली भारत या इंडेक्समध्ये ८१ व्या क्रमांकावर होता. २०१६ मध्ये ६६व्या, २०१७ मध्ये ६०व्या, २०१८ मध्ये ५७ व्या, २०१९ मध्ये ५२व्या तर २०२० मध्ये ४८ व्या स्थानावर होता.
भारताने जीआयआयच्या सर्व घटकांमध्ये सुधारणा केली आहे. आयटी सेवा, सरकारी ऑनलाइन सेवा, विज्ञान, इजिनिअरिंग याबाबत भारताने चांगली कामगिरी केली आहे. आयआयटी मुंबई, दिल्ली, इंडियन इस्टीट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू सारख्या संस्थांमुळे भारताने हा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा

Back to top button