हवाला प्रकरणात ‘ईडी’ची चीनी कंपन्यांवर मोठी कारवाई, नऊ कोटी रुपयांवर टाच | पुढारी

हवाला प्रकरणात 'ईडी'ची चीनी कंपन्यांवर मोठी कारवाई, नऊ कोटी रुपयांवर टाच

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – हवाला प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने चीनच्या नियंत्रणाखालील कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कंपन्यांच्या नऊ कोटी रुपयांवर ईडीने टाच आणली आहे. ज्या कंपन्यांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे, त्यात कॉमिन नेटवर्क टेक्नॉलाजी प्रा. लि., मोबिक्रेड टेक्नॉलॉजी, मॅजिक डेटा टेक्नॉलॉजी, बैतू टेक्नॉलॉजी, अलियेये नेटवर्क, वुईकॅश टेक्नॉलॉजी, लार्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, मॅजिक बर्ड, एसपर्ल सर्व्हिसेस आदी कंपन्यांचा समावेश आहे.

वरील कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत ईडीने ही कारवाई केली आहे. याआधी ईडीने पेटीएम, ईजबझ, रेझरपे, कॅशफ्री या कंपन्यांच्या बॅंक खात्यात तसेच आभासी खात्यांमध्ये ठेवलेले 46.67 कोटी रुपये ताब्यात घेतले होते. हवाला प्रकरणात नागालॅंड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून ही कारवाई सुरु आहे. एचपीझेड टोकन ही अॅप आधारित कंपनी असून बिटकॉईन तसेच क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे सांगून या कंपनीने लोकांकडून पैसा जमा केला होता. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button