कुपवाडामध्ये घुसखोरीचा डाव उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त | पुढारी

कुपवाडामध्ये घुसखोरीचा डाव उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त

श्रीनगर: पुढारी ऑनलाईन – भारतीय सैन्‍यदलाच्‍या जवानांनी काश्‍मीरमधील कुपवाडा येथे घुसखोरीचा डाव उधळला. या वेळी झालेल्‍या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. एके ४७ रायफलसह मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त करण्‍यात आला आहे.

कुपवाडामधील माछिल सेक्‍टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्‍न केला. हा डाव सुरक्षारक्षकांनी उधळून लावला. यावेळी झालेल्‍या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. एके ४७ रायफलसह मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त कर्‍यात आला आहे. परिसरातील शोध मोहित तीव्र करण्‍यात आली असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी ( दि. २४ ) रात्री दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा येथे दोन परप्रांतीय मजुरांवर दहशतवाद्‍यांनी गोळीबार केला. जखमी मजूर हे बिहारमधील बेतिया जिल्‍ह्यातील आहेत. दोघेही कामावरुन परताना त्‍यांना रस्‍त्‍यावर अडवून दहशतवाद्‍यांनी गोळ्या झाडल्‍या होत्‍या. या दोघांना पोलिसांनी रुग्‍णालयात दाखल केले असून त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. धक्कादायक : गोंदियात १२० मुला-मुलींचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास; १० मुलांची प्रकृती बिघडली
  2. Man Ki Baat : चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव ; पंतप्रधान माेदींची घोषणा
  3. देशविरोधी कृत्य, घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी करणार: चंद्रशेखर बावनकुळे

Back to top button