Hema Malini: …’मथुरा’मधून अभिनेत्री कंगना निवडणूक लढविणार? हेमामालिनींनी दिले उत्तर…

Hema Malini: …’मथुरा’मधून अभिनेत्री कंगना निवडणूक लढविणार? हेमामालिनींनी दिले उत्तर…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत उत्तर प्रदेशातील मथुरा येथून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात भाजपच्या मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना प्रश्‍न विचारण्‍यात आला. यावेळी त्‍यांनी दिलेल्‍या उत्तराने उपस्‍थित आवाक झाले.

उद्या राखी सावंतलाही खासदार करणार का ?

राजीव भवन येथे दिव्यांगजनांना हाताने चालवलेल्या ट्रायसायकलचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेमामालिनी(Hema Malini) यांना कंगना राणावत निवडणूक लढवणार असल्याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्‍या म्हणाल्या की, मथुरेत सर्व फिल्मस्टार्सची गरज आहे काय ? येथील कोणत्याही व्यक्तीला खासदार व्हायचे असेल तर. उद्या राखी सावंतलाही येथे निवडणुकीसाठी उभे केले, तर तिलाही खासदार करणार का ? असा प्रतिप्रश्न हेमामालिनी यांनी केला.

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, कंगणा राणावत निवडणूक लढवणार असेल. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु मथुरेतील जनतेला खासदार व्हायचे असेल, तर तुम्ही त्यांना मतदान करणार नाही. कारण मुथेरामधून केवळ एका फिल्मस्टारलाच तुम्ही खासदार करणार. उद्या राखी सावंत निवडणूक लढवणार असेल, तर तुम्ही तिलाही खासदार करणार का ?, असा सवाल त्‍यांनी केला.

दरम्यान, 2024 मध्ये मथुरा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर यावरून आतापासूनच सट्टाबाजार चांगलाच तापला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मथुरेतून निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news