‘पीएफआय’च्या १० सदस्यांच्या कोठडीची ‘एनआयए’ ची मागणी

एनआयए
एनआयए
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) देशभरातील कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडी दरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांमधून आक्षेपार्ह सामुग्री आढळल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अहवालातून केला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयासमक्ष सादर केलेल्या रिमांड रिपोर्ट मधून १० जणांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 'पीएफआय'ने तरुणांना लष्कर-ए-तोयबा तसेच इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप 'एनआयए'ने केला आहे. विशेष म्हणजे पीएफआय एक प्रशिक्षण कार्यक्रम चालवत असून, औरंगाबाद आणि जालनात सदस्य भरती करीत असल्याचा अलर्ट महाराष्ट्र गुप्तचर विभागाने जारी केला होता.

'एनआयए'ने २२ सप्टेंबरला देशातील ११ राज्यात पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर धाड टाकत १०६ सदस्यांना अटक केली होती. 'एनआयए'ने सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच राज्य पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हे 'ऑपरेशन ऑक्टोपस' चालवले होते. या कारवाई दरम्यान केरळमधून सर्वाधिक २२ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून प्रत्येकी २०, तामिळनाडूमधून १०, आसाम ९, उत्तर प्रदेश ८, आंधप्रदेश ५, मध्यप्रदेश २, पॉन्डेचेरी आणि दिल्लीतून प्रत्येकी ३ आणि राज्यस्थानमधून दोघांना अटक करण्यात आली.

देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घातपाती, तसेच समाजकंटकाकडून केलेल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलीस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी येत असल्याचे एनआयएच्या अहवालातून समोर आले. या संघटनेच्या वतीने परदेशातून विशेषतः आखाती देशातून येणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जात असल्याची माहिती होती.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news