

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी ( Prince Harry) यांचे शाही कुटुंबाबरोबरील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबाने राजघराण्यापासून फारकतही घेतली हाोती. राणी एलिझाबेथ यांच्या निधनादिवशी आयोजित किंग चार्ल्स यांनी रात्रीच्या भोजनास प्रिन्स हॅरीची पत्नी मेघन मार्कल हिला उपस्थित राहण्यास मनाई केली होती. हा अपमान जिव्हारी लागल्याने पिन्स हॅरीने शाही परिवाराच्या डिनरवर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त 'टेलिग्राफ'ने दिले आहे.
गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले होते.स्कॉटलँड येथे बाल्मोरल कॅसल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात आले.
प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांना राणी एलिझाबेथ द्वितीयच्या अंत्यसंस्कार विधीसाठी आमंत्रणे देण्यात आले होते. आजीला अंतिम निरोप देण्यासाठी राजघराण्यापासून हे दोघे ब्रिटनला आले. याच दिवशी परंपरेनुसार बाल्मोरल कॅसल येथे शाही परिवारासाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हे डिनर केवळ राजघराण्यातील सदस्यांसाठी असल्याचे सांगत मेघन मार्कल यांना निमंत्रण नाकारण्यात आले.
हॅरी आणि मेघन यांनी २०२० मध्ये शाही परिवारापासून फारकत घेतली होती. त्यामुळे त्यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहताना अनेक अडचणी आल्याचे टेलिग्राफने म्हटलं आहे. ब्रिटीश सैन्यात दहा वर्ष सेवा दिलेले हॅरी यांना लष्कराच्या गणवेषात शाही दफनविधीला उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. कारण हॅरी यांनी राजघराण्यातील सदस्य म्हणून पायउतार झाले तेव्हाच त्याच्या लष्करी पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या.
माझी आजी ही आमची मार्गदर्शक होती. तिने सेवा आणि कर्तव्याप्रती दाखवलेली बांधिलकी आदर्शवत अशीच होती. तिची जागतिक स्तरावरील वाटचाल ही प्रशंसनीय आणि आदरणीय होती, असे हॅरी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं होतं. शाही परिवाराासाठी आयोजन भोजप समारंभास हॅरी यांच्या पत्नीला प्रवेश नाकारण्यात आल्याने ते दुखावले. त्यांनी थेट या कार्यक्रमाकडेच पाठ फिरवत आपली नाराजी दर्शवल्याची चर्चा ब्रिटनमध्ये रंगली आहे.
हेही वाचा :