चेन्नई : आज्जीने नातवासाठी बनवले मासे-भात, पण त्यानेच केला आज्जीचा घात | पुढारी

चेन्नई : आज्जीने नातवासाठी बनवले मासे-भात, पण त्यानेच केला आज्जीचा घात

पुढारी ऑनलाईन : आज्जीने नातवाला आवडणारे, स्वत:च्या हाताने बनवलेली फिश करी आणि भात खाऊ घातली. त्यानंतर पैशावरून झालेल्या बाचाबाचीत रागाच्या भरात ब्लेड आणि हातोड्याने वार करत, नातवानेच आज्जीचा खून केला. त्याच्या आईकडून घेतलेले १ लाख रूपये, आज्जीकडे परत करण्यासाठी त्याने आग्रह धरला. यावेळी त्यांची बाचाबाची झाली. वार केल्यानंतर त्याने घराचे दरवाजे बंद केले आणि टिव्ही पाहत असतानाच आज्जीच्या डोक्यात रक्तस्त्राव होऊन, त्याच्या आज्जीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की, विसलक्षी ही ७० वर्षीय वृद्ध महिला चेन्नईमधील कोर्रुकुपेट येथील रहिवाशी आहे. ही वृद्ध महिला कोर्रुकुपेटमधील करूमरीनगर येथे एकटीच रहाते. २८ वर्षीय सतीश हा तिच्या मुलीचा मुलगा आहे. आज्जीने नातवाला त्याच्या आवडीचे फिश करी प्रेमाने खायला दिली. त्यानंतर त्यांच्यात पैशावरून बाचाबाची झाली. यानंतर नातवाने स्वत:च्या आज्जीवरच ब्लेड आणि हातोड्याने वार केले.

या आवाजाने जेव्हा शेजारी विचारण्यासाठी आले तेव्हा, त्याने तो टिव्हीचा आवाज असल्याचे सांगितले, त्यानंतर तो काही झालेच नाही अशा अविर्भावात तो तसाच टिव्ही बघत बसला. त्यानंतर आज्जीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याने त्याच्या आईला फोनवरून सांगितले की, आज्जी जखमी होऊन पडली. हे ऐकताच संबंधित आरोपीची आई धावत कोरुक्कुपेटला येथे आली. तिला सरकारी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा:

Back to top button