Us Fed Interest Rate : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढवले | पुढारी

Us Fed Interest Rate : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढवले

पुढारी ऑनलाईन : वाढत्या महागाईला रोखण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Us Fed Interest Rate) पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केलेली आहे. व्याजदरात ०.७५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांनी आज जाहीर केला.

वाढत्या महागाईमुळे जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदरात वाढ करत असल्याचे चित्र आहे. फेडलर रिझर्व्हने (Us Fed Interest Rate)यापूर्वी व्याजदर ७५ बेसिक पॉईंटने वाढवले होते. अमेरिकेतील महागाई २ टक्केपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट फेडरल रिझर्व्हने ठेवले आहे. पण अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात महागाईचा निर्देशांक ८.३ टक्के इतका होता.

अमेरिकेतील व्याजदरांचा परिणाम जगभरातील गुंतवणुकीवर होतो, त्यामुळे अनेक देशांचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते. तर जागतिक बँकेने जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत असल्याने त्याचा परिणाम जागतिक जीडीपवर होऊन जगभरात मंदी येऊ शकते, असा इशारा यापूर्वीच दिलेला आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचे पडसाद यापूर्वी जगभरातील शेअर बाजराता उमटले होते. (Us Fed Interest Rate)

भारतीय रिझर्व्ह बँकेची २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान मॉनेटरी पॉलिसीशी संबधीत बैठक पार पडणार आहे. अमेरिकेने वाढवलेल्या व्याजदरामुळे भारतीय रिझर्व्ह बँक देखिल आपल्या व्याज दरात वाढ करण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

अधिक वाचा :

Back to top button