Nutrition tips for children : मुलांचा अभ्यास दर्जेदार होण्यासाठी आहारही ‘असा’ हवा; जाणून घ्या सविस्तर

Nutrition tips for children : मुलांचा अभ्यास दर्जेदार होण्यासाठी आहारही ‘असा’ हवा; जाणून घ्या सविस्तर

Nutrition tips for children : अभ्यास चांगला दर्जेदार होण्यासाठी शारीरिक, मानसिक क्षमता महत्त्वाची असते. ही क्षमता निर्माण करण्यासाठी सकस, नियमित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. आपण मुलांना चटकदार, चवदार, जिभेचे लाड पुरविणारे पदार्थ खायला देतो, पण यामुळे मुलांना वाईट सवयी लागतात. एकदा खाल्यानंतर मुलं पुन्हा पुन्हा बेकरीचे, चटकदार, पदार्थ खाण्याचा हट्ट धरतात. प्रसंगी त्यांचे पोटही बिघडते. याचा परिणाम त्यांच्या पचनसंस्थेवर होतो. सातत्याने खाण्यात फास्टफूड किंवा तत्सम पदार्थ आल्याने, याचा मुलांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. वारंवार आजारी पडल्याने, मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमताही कमी होते, ज्या दर्जेदार अभ्यासासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मुलांना सकस आणि आरोग्यदायी आहार देणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया मुलांचा आहार कसा असावा…

  • मुलांचा आहार हा चौरस असावा, आहारात हिरव्या पालेभाज्या, धान्ये-कडधान्ये, दूध-दुधाचे पदार्थ, अंडी-मांस-मासे, फळे यांसारख्या सकस पदार्थांचा समोवेश करावा.
  • अधिक सकस व सत्विक आहार हा मुलांना पालेभाज्यांतून, फळांतून, दुधातून, मोड आलेल्या कडधान्यांतून सहज मिळतो. त्यामुळे हा सकस आहार शक्यतो नियमित आणि वेळेतच घ्यावा.
  • पाव, चॉकलेट, बिस्किटे, कुरकुरे, तळलेले वडे, जाम, कचोरी, समोसा, भजी, वे उघड्यावरचे तयार अन्न, मिठाई, पेये आदी. पोट बिघडविणारे पदार्थ खाण्याचे टाळावे.
  • जे काही खाल ते चांगले चावून खावे म्हणजे अन्नात भरपूर प्रमाणात लाळ मिसळेल. काहीही खाताना ते सावकाश आणि आनंदाने खावे.
  • दिवसभरात भरपूर शुद्ध पाणी प्यावे, जेणेकरून मेंदूला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल. मेंदुला भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने आळस, झोप येणार नाही. फ्रेश वाटेल आणि अभ्यासात मन लागेल.
  • वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध होणारी फळे, पालेभाज्या यांचा समावेश देखील मुलांच्या आहारात करावा.
  • मुलांना भूक लागल्यानंतर कच्चा टोमॅटो,गाजर आणि काकडी चिरून खायला द्या.
  • मुलांना जेवायला देताना त्यांना एका जागी शांत बसवून मग जेवायला द्यावे. जेवण करताना मुलांना चिडचिडेपणा करू देऊ नका. शांत जेवल्याने घेतलेल्या आहाराचे चांगल्या पद्धतीने पचन होते.
  • मुलांचे दात मजबूत रहावेत, डोळे अधू होऊ नये, अभ्यासाची उमेद खचू नये यासाठी कटाक्षाने चमचमीत आहार टाळावा आणि सकस आहाराचा आदर करावा.
  • सकस आहार कटाक्षाने घेतला पाहिजे. कारण चांगला सकस आहार हा तुमच्या अभ्यासमार्गातील महत्त्वाचा घटक आहे. तोच तुम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी ऊर्जा पुरवणार आहे.
  • असा सात्विक, शुद्ध आणि दर्जेदार आहारसेवनाने मुलांना अभ्यासासाठी चांगली ऊर्जा (शक्ती) मिळू शकते. (Nutrition tips for children)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news