मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन अडचणीत; ८ तास चौकशी, जबाबात तफावत | पुढारी

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन अडचणीत; ८ तास चौकशी, जबाबात तफावत

सुकेश प्रकरणात जॅकलिन अडचणीत; ८ तास चौकशी, जबाबात तफावत

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन – सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस चांगलीत अडचणीत सापडणार अशी चिन्हं आहेत. दिल्लीतील इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने मंगळवारी तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान जॅकलिनच्या जबाबात तफावत दिसून आल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी जॅकलिनला १०० प्रश्नांची यादीच दिली होती. या प्रकरणात नोरा फतेही हिलाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

सुकेश चंद्रशेखर हा ठकसेन सध्या तुरुगांत आहे. त्याच्यावर २०० कोटींच्या फसवणुकीचे आरोप आहेत. सुकेशने जॅकलिन आणि नोरा यांच्यावर भेटवस्तूंची उधळण केली होती. त्यातून या दोघींची चौकशी सुरू आहे. पिंकी इराणी हिने सुकेश आणि जॅकलिनची ओळख करून दिली होती. पोलिसांनी काल पिंकी इराणी हिचीही चौकशी केली.

विशेष पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी ‘एनआयए’शी बोलताना या चौकशीची माहिती दिली आहे. “सुकेशकडून जॅकलिनला ज्या भेटवस्तू मिळाल्या, त्याबद्दल आम्ही चौकशी केली. पिंकी इराणी हिलाही यावेळी बोलवण्यात आले होते.”

गेल्या महिन्यात EDने जॅकलिनची चौकशी केली होती. “जॅकलिनच नाही तर तिचे नातेवाईक, मित्र यांनाही या नातेसंबंधाचा फायदा झाला होता. यावरून पैशाच्या हव्यासासमोर आपण कुणाशी संबंधात आहोत, त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, याचा तिला काहीच फरक पडत नव्हता, असे दिसते,” असे EDच्या पुरवणी दोषारोपपत्रात म्हटलेf आहे.

हेही वाचा

 

Back to top button