नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालमध्ये क्रूरता आणि हिंसाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचा आरोप भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी आज केला. भाजप कार्यकर्त्यांनी कोलकाता येथे सचिवालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान प्रचंड हिंसाचार झाला होता.
प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन दिली. राज्यात क्रूरता आणि हिंसाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचे सांगून प्रसाद पुढे म्हणाले की, प. बंगाल हे बौध्दिक परंपरा आणि सांस्कृतिकतेने नटलेले राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र ममता बॅनर्जी यांचे राज्य जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून हे राज्य कायदाविहिन आणि दिवाळखोरी निघालेले बनले आहे.
ममता बॅनर्जी यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ आली आहे. लोकशाही वाचविण्याची भाषा करणार्या ममतांनी बंगालमध्ये काय सुरु आहे, ते आधी पाहिले पाहिजे. सर्व मर्यादा त्यांनी व त्यांच्या सरकारने ओलांडल्या आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :