तेलंगणा : सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

तेलंगणा : सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणामधील सिकंदराबाद येथील हॉटेलच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तळमजल्यावरील इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागल्याने ही दुर्घटना घडली. उर्वरित लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यांना स्थानिकांनी वाचवले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिकंदराबाद येथील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागली. ही आग वरच्या मजल्यावर पसरली. या भीषण आगीच्या दुर्घटनेत चार मजली हॉटेलमध्ये राहणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला.

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागल्यानंतर धुराचे लोट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पसरले. यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी दिली. प्राथमिक अहवालानुसार ही आग इलेक्ट्रिक बाईक शोरूमच्या तळघरात लागली आणिती वरच्या मजल्यापर्यंत पसरली. यामुळे जीवितहानी झाल्याचे आनंद यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button