पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस चर्चेत असलेली कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालालील भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) बुधवार (७ सप्टेंबर) पासुन कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज अंदाजे 21 किमी पायी प्रवास केला जाणार आहे, 150 दिवसांत 3 हजार 570 किमी अंतर कापून ही काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. सोशल मीडियावर या यात्रेची चर्चा सुरु आहे. या यात्रेबद्दल संमिश्र भावना उमटत आहेत. (Rahul Gandhi T Shirt ) दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत सोशल मीडियावर "भारत देखो" असं लिहीत राहुल गांधी यांचा फोटो शेअर केला. या वरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. आरोप-प्रत्यारोप होवू लागले आहेत.
कॉंग्रेस नेते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालालील भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस. भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर "भारत देखो" असं लिहीत राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी यांनी पांढरा टी- शर्ट घातला आहे तर फोटोच्या बाजुला त्या फोटोचा ब्रॅंड आणि त्याची किंमत दिली आहे. तो टी-शर्ट बर्बरी ब्रॅंडचा असुन त्याची किंमत 41,257 दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सोशल मीडिया पोस्टवरुन भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आणखी एक नवा वाद सुरु झाला आहे.
भाजपने भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवणाऱ्या फोटोला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिल आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "अरे तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेमध्ये जमलेली गर्दी पाहून. मुद्याचं बोला, बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांवर चर्चा करायची असेल तर मोदींच्या 10 लाख सूट आणि 1.5 लाखाच्या चष्म्यापर्यंत जावू शकते, सांगा काय करायचे? अशी खोचक पोस्ट करत कॉंग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचलंत का?