Tanot Temple : ...पाकिस्तानने हजारो बॉम्ब शेल टाकूनही एकही स्फोट न झालेल्या तनोट मंदिराचा होणार विकास | पुढारी

Tanot Temple : ...पाकिस्तानने हजारो बॉम्ब शेल टाकूनही एकही स्फोट न झालेल्या तनोट मंदिराचा होणार विकास

पुढारी ऑनलाइन डेस्क : राजस्थानच्या सीमाभागात असलेल्या तनोट मंदिर Tanot Temple परिसराचा मोठा विकास होणार आहे. यासाठी तब्बल 17 कोटी 67 लाख रुपये भारत सरकारकडून मंजूर करण्यात आले आहे. तनोट हे तेच मंदिर आहे ज्याच्या परिसरात 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने हजारो बॉम्ब शेल टाकले होते. मात्र, आश्चर्याची गोष्ट अशी की या पैकी एकही बॉम्बचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मंदिर संकुल परिसरातील लोक याला तनोट मातेचा एक चमत्कार मानतात. या मंदिर संकुल परिसरात अमित शहा यांनी शनिवारी विकास कामाची पायाभरणी केली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शनिवारी राजस्थानमधील जैसलमेरपासून सुमारे 120 किमी अंतरावर असलेल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या Tanot Temple तनोट मंदिर संकुलात सीमा पर्यटन विकास कामाची पायाभरणी केली. राजस्थानच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून गृहमंत्र्यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली. शुक्रवारी संध्याकाळी ते जैसलमेरला पोहोचले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून सीमा पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तनोट मंदिर परिसर प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.

Amit Shah’s Marathi tweet : अमित शहा यांच मराठीमध्ये ट्विट, “गणेशोत्सवादरम्यान मुंबईत…”

तनोट मंदिर संकुल प्रकल्पासाठी 17 कोटी 67 लाख रुपये भारत सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी वेटिंग रूम, अॅम्फी थिएटर, इंटरप्रिटेशन सेंटर, मुलांसाठी खोली आणि इतर आवश्यक सुविधा विकसित केल्या जातील.

पर्यटन मंत्रालयाच्या या प्रकल्पामुळे भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या तनोट आणि जैसलमेर या भागांचा विकास होईल आणि सीमा भागात रोजगाराच्या संधी वाढतील. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकज कुमार सिंह, अतिरिक्त महासंचालक (पश्चिम कमांड) पी. रामशास्त्री, महानिरीक्षक (राजस्थान सीमा) डेव्हिड लालरिंगा, पर्यटन मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार ज्ञानभूषण आणि इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात, पाकिस्तानने Tanot Temple तनोट राय माता मंदिर संकुलात हजारो बॉम्ब शेल टाकले होते परंतु त्यापैकी एकही तनोट मातेच्या चमत्काराने स्फोट झाला नाही. 1965 पासून बीएसएफ या मंदिराच्या पूजा आणि व्यवस्थेची जबाबदारी घेत आहे. बीएसएफ हे मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून चालवते आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी मातेच्या ‘आरती आणि भजन संध्या’चे आयोजन केले जाते ज्यामध्ये हजारो भाविक देशाच्या विविध राज्यांमधून येतात. तसेच या मंदिराला आध्यात्मिक आणि देशभक्तीचा संगम असणारे मंदिर मानले जाते.

1971 च्या भारत-पाकिस्तान लोंगेवाला युद्धादरम्यान, बीएसएफच्या शूर जवानांनी लोंगेवाला पोस्टवर महत्त्वपूर्ण आणि निर्णायक भूमिका बजावली होती. गतवर्षी 4-5 डिसेंबर रोजी गृहमंत्र्यांनी तनोट मंदिराला भेट देऊन तेथील पर्यटन संभावनांचा आढावा घेतला तसेच इतर सीमा चौक्यांवर रात्रीची विश्रांती घेऊन सैनिकांचे मनोबल वाढवले.

Back to top button